श्री बोडगेश्‍वरदेवाच्या जत्रोत्सवातील कार्यक्रम

म्हापसा शहराच्या दक्षिणेला शहराच्या प्रवेशद्वाराजवळ श्री देव बोडगेश्‍वराचे भव्य आणि सुंदर असे मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजेच म्हापसा-कळंगुट रस्त्याच्या बाजूने एक भव्य प्रवेशद्वार आहे. तसेच मंदिराच्या पाठीमागे प्रशस्त असे सभागृह बांधण्यात आले आहे. मंदिराच्या सभोवताली शेती असल्यामुळे हिरव्यागार वातावरणात मंदिर खूपच सुंदर दिसते.

उत्सवातील कार्यक्रम

दीपस्तंभ

बुधवार, २७ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता श्री देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता श्री. पांडुरंग राऊळ आणि साथी यांचा भजनाचा कार्यक्रम, तसेच रात्री १२ वाजता पारंपरिक पौराणिक दशावतारी नाटक पावन झाली पुण्यभूमी असेल.

श्री बोडगेश्‍वरदेव वापरत असलेल्या कोल्हापुरी चपलेची चांदीची प्रतिकृती

२८ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता श्री. मोहनदास पोळे आणि साथी यांचा भजनाचा कार्यक्रम आणि रात्री ११ वाजता श्रींची आरती अन् प्रार्थना होऊन उत्सवाची सांगता होेईल.

२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी प्रतिदिन सत्यनारायण पूजा

देवस्थान प्रांगणातील श्री सत्यनारायणदेवाची मूर्ती

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी प्रत्येक दिवशी अनुक्रमे पिकअप-डायव्हर असोसिएशन; मासळी विक्रेत्या महिला; रिक्शा ड्रायव्हर असोसिएशन (कदंबा स्डँड) म्हापसा; म्हापसा नगरपालिका; म्हापसा व्हेजिटेबल व्हेन्डर्स यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजा असणार आहे. या काळात प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता भजनांचा कार्यक्रम होईल.