५०० अब्ज रुपयांसाठी पाक सरकार महंमद अली जिना यांच्या बहिणीच्या नावे असलेलले पार्क गहाण ठेवणार !

पुढे संपूर्ण पाकला विकायला काढावे लागण्याची स्थिती निर्माण होणार आहे, यात कुणीच शंका घेण्याची आवश्यकता नाही !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पाकची निर्मिती करणारे महंमद अली जिना यांच्या बहिणीच्या नावाने असणारे प्रसिद्ध ‘फातिमा जिना पार्क’ गहाण ठेवण्याच्या विचारात आहे.

पाकमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सरकार ५०० अब्ज रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी इस्लामाबादमधील एफ् ९ सेक्टरमधील सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे पार्क गहाण ठेवण्याच्या संदर्भातील प्रस्ताव २६ जानेवारीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. इस्लामाबादमध्ये त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ बवण्यात आलेले हे पार्क ७५९ एकरांमध्ये पसरलेले आहे. हे पार्क येथील स्थानिक लोक मनोरंजनासाठी वापरतात.