तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत भाजपकडे 

प्रतिकात्मक चित्र

सातारा, १९ जानेवारी (वार्ता.) – तालुक्यातील दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र संगम माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. ९ पैकी ५ जागांवर विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांचा ग्रामपंचायतीवरील प्रभाव यामुळे सिद्ध झाला आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढवण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनेलचे प्रवीण शिंदे, अविनाश कोळपे, प्रकाश माने, हेमलता पडवळ आणि साधना सावंत हे सदस्य निवडून आले आहेत. तसेच संगम माहुली ग्रामस्थांनी या सदस्यांना निवडून देत त्यांना खंबीर साथ दिली आहे. तीर्थक्षेत्र संगम माहुलीच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणार असल्याचे आश्‍वासन शिवनामे यांनी दिले आहे.