
ठाणे – शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्ती यांचे फेसबूक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून त्यांनी पैसेही काढले आहेत.
गेल्या काही मासांपासून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक लूट करण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. एखाद्या व्यक्तीचे फेसबूक किंवा ट्विटर खाते हॅक करून त्याचे छायाचित्र चोरून संबंधित व्यक्तीच्या फेसबूक मित्रांकडून पैसे मागण्याचा प्रकार चालू आहे. परिचयातील अथवा मित्र असलेल्या व्यक्तीकडून पैशांची मागणी करणारा संदेश येत असल्याने लोक तो संदेश खरा समजून संदेशावर नमूद केलेल्या बँक खात्यात पैसे पाठवून देतात आणि नंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे येत आहेत. आता या गुन्हेगारांची मजल पोलिसांचे फेसबूक खाते हॅक करण्यापर्यंत गेली आहे. गेल्या मासात ठाणे पोलीस दलातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे फेसबूक खाते हॅक करून त्यांच्या फेसबूक मित्रांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला आहे. ठाण्यातील अधिवक्ते, बँकिंग, तसेच उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचेही या गुन्हेगारांनी फेसबूक खाते हॅक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पोलिसांकडून या प्रकाराला रोखण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात असून अजूनही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही.
फसवणुकीची पद्धत
एखाद्या व्यक्तीचे फेसबूक खाते हॅक झाल्यानंतर त्याचे छायाचित्र वापरून गुन्हेगार त्या व्यक्तीच्या फेसबूक मित्रांना साहाय्य करण्याचे संदेश पाठवतो. या संदेशात आई-वडील आजारी असल्याचे किंवा कोरोनामुळे आर्थिक चणचण आल्याचे सांगितले जाते. तसेच पैसे जमा करण्यासाठी एक भ्रमणभाष क्रमांकही पाठवला जातो. या काळात ज्या व्यक्तीचे खरे फेसबूक खाते असते, त्याला ते वापरतांना अडचणी येण्यास आरंभ होतात.
काय काळजी घ्याल ?
फेसबूक खाते हॅक होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या ‘पासवर्ड’मध्ये चिन्हे, क्रमांक आणि शब्द यांचा मिश्र वापर करावा. त्यामुळे पासवर्ड हॅक करणे कठीण जाते. तसेच पासवर्डमध्ये जन्मदिनांक, स्वत:चे नाव आदी गोष्टींचा वापर करू नये; क ारण सायबर भामटे असे पासवर्ड सहज शोधून काढू शकतात.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)