वाळपई, १२ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे. कर्नाटकच्या या गोहत्याबंदी कायद्यामुळे गोव्यात कर्नाटकमधून येणार्या गोमांसाच्या अनधिकृत वाहतुकीला आळा बसणार आहे, असे मत ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी व्यक्त केले आहे.
श्री. हनुमंत परब पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणावर गुरे आणून त्यांची हत्या केली जात आहे, तसेच गुरांची अनधिकृत वाहतूक होत आहे. कर्नाटकने गोहत्या बंदी कायदा केल्याने या प्रकारांना आता आळा बसणार आहे. गोव्यातील गोप्रेमी आता गोवंशियांच्या आंतरराज्य वाहतुकीविषयी अधिक सतर्कता बाळगतील. गोवा शासनानेही याविषयी सतर्कता बाळगली पाहिजे. ‘गोवंश रक्षा अभियान’ने यापूर्वी गोमांसाच्या अनधिकृत आंतरराज्य वाहतुकीवरून उपजिल्हाधिकार्यांकडे तक्रार नोंदवली आहे; मात्र याविषयी कोणतीही कारवाई झालेली नाही.’’ (अल्पसंख्यांकांच्या भीतीमुळेच प्रशासनही गोप्रेमींनी केलेल्या तक्रारीची नोंद घेत नाही. २ राजकीय पक्षांनी कर्नाटकच्या गोहत्याबंदी कायद्यावरून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, अशी चेतावणी देऊन अल्पसंख्यांक किंवा गोमांस भक्षक असहिष्णु असतात, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासन किंवा पोलीस हेही त्यांना घाबरतात, यात नवल नाही ! – संपादक)