भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकला भीती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे. याविषयीचे वृत्त पाकच्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या भीतीमुळे पाकने भारतीय सीमेवर सैनिकांना सतर्क केले आहे.