सनातन संस्थेविषयी आदर असणारे डोंबिवली येथील कै. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर !

कै. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर

‘१८.११.२०२० या दिवशी सकाळी डोंबिवली येथील सोन्याचांदीच्या दागिन्यांचे व्यापारी श्री. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर यांचे निधन झाल्याचे मला समजले.

१. प्रेमभाव

माझे आणि त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. मी डोंबिवली येथे गेल्यावर त्यांना भेटत असे. दुकानात कितीही गर्दी असली, तरी ते माझ्याशी गप्पा मारायचे. ते प्रेमळ होते.

२. सनातन संस्थेविषयी आदर

त्यांना सनातन संस्थेविषयी पुष्कळ आदर होता आणि ते त्याविषयी मला सांगायचे. ते आणि त्यांचे मित्र श्री. जोशी रामनाथी आश्रमात येऊन गेले होते. त्यांना आश्रमातील शिस्त आणि स्वच्छता आवडली होती.

३. सनातनच्या कार्यात सहभाग

ते पद्मनाभ संप्रदायाच्या माध्यमातून साधना करायचे. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते. ते प्रतिवर्षी विज्ञापन द्यायचे. दत्तजयंतीच्या दिवशी त्यांच्या रहात्या घराजवळील मोकळ्या जागेत ते ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी साधकांना जागा उपलब्ध करून देत असत.​

‘श्री. बाळकृष्ण मुकुंद नार्वेकर यांच्या आत्म्यास शांती लाभो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२०)