भाजपने उभारलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे वीजदेयक वाढवण्याची वेळ आली ! – डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

वीजदेयकावर सवलतीची घोषणा करतांना मंत्रीमहोदयांना हे माहीत नव्हते का ?

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत ३ मासांची देण्यात आलेल्या वीजदेयांची रक्कम अधिक असल्यास रक्कम ३ हप्त्यांमध्ये घेण्याचे नियोजन करू. रक्कम एकदम भरल्यास देयकामध्ये २ टक्के सवलत देऊ. संधी मिळेल, तशी लोकांना साथ देऊ. अन्य सोंगे उभारता येतात; मात्र पैशाचे सोंग उभे करता येत नाही. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजपने राज्यावर ४ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभारला. त्यामुळेच राज्यावर ही परिस्थिती ओढवली आहे, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजदेयकांवर सवलत देण्याविषयी केले. २६ नोव्हेंबर या दिवशी वीजदेयकांमध्ये सवलत द्यावी, यासाठी मनसेने राज्यव्यापी आंदोलन उभारले. त्याविषयी पत्रकारांनी राऊत यांना विचारला असता त्यांनी वीजदरवाढीचे खापर भाजपवर फोडण्याचा प्रयत्न केला.