सौभाग्यालंकारांचे आध्यात्मिक महत्त्व जाणा आणि त्या माध्यमातून धर्माचरण करा !

मंगळसूत्र

‘मंगळसूत्रात दोन वाट्या असतात. अशा प्रकारच्या रचनेमुळे मंगळसूत्राच्या उलट पोकळीत निर्माण होत असलेल्या आकर्षणलहरींमुळे अन्य कोणत्याही अलंकारांच्या तुलनेत ईश्‍वरी तत्त्व मंगळसूत्राकडे सर्वांत जास्त प्रमाणात आकृष्ट होते.’

बांगड्या

‘हिरव्या बांगड्या घालणे, हे सुवासिनीतील पातिव्रत्यदर्शक प्रकट शक्तीरूपाची सालंकृत पूजा करण्याचे प्रतीक आहे. बांगड्यांमध्ये कार्यरत असणार्‍या देवीतत्त्वाच्या शक्तीलहरी मनगटामध्ये ग्रहण होऊन संपूर्ण हातात पसरल्यामुळे हाताला कार्य करण्यासाठी शक्ती मिळते.’

कुंकू

‘कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होतात आणि वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.’

जोडवी

‘जोडवी या अलंकारामुळे स्त्रीला तिचा स्त्रीधर्म, कर्तव्य आणि नियम यांची सातत्यानेे जाणीव होते. त्यामुळे स्त्री विवेकाच्या बंधनात अडकून रहाते आणि धर्मपालन करते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अलंकाराचे महत्त्व’)