शक्यतो पूर्वेस किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे. ‘पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा र्हास होतो’, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे. झोपेच्या वेळी अती वार्याचे सेवन करू नये; कारण तसे केल्याने शरिरात रूक्षता वाढते, त्वचेचे आरोग्य बिघडते आणि सांधे जखडतात. प्रत्येकाने आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. सामान्य माणसाला सर्वसाधारण ६ ते ८ घंटे झोप पुरते. ‘आपण किती झोप घेतल्यास दिवसभरात आपली कार्यक्षमता चांगली रहाते’, याचा स्वतःच अभ्यास करून त्यानुसार आपल्या झोपेचा अवधी ठरवावा.