दैनिक ‘सनातन प्रभात’चे नूतन ‘अॅप’ बघतांना ‘संगणकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांना पडावेत’, असे कल्पनेपलीकडील प्रश्न विचारणे
‘प.पू. गुरुदेवांना ‘सनातन प्रभात’चे अंतिम टप्प्यातील नूतन Android Mobile App एका साधकाने दाखवले. परात्पर गुरुदेव स्वतः भ्रमणभाष वापरत नाहीत, तरीही भ्रमणभाषमधील ‘अॅप’ बघतांना त्यांनी निवडक प्रश्न विचारले. त्यांचे प्रश्न तांत्रिक होते. आधुनिक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा संगणकीय क्षेत्र यांतील पुष्कळ अनुभवी लोकांना सॉफ्टवेअर डिझाईन करतांना असे प्रश्न पडतात किंवा त्यांचा विचार केला जातो. त्यांनी विचारलेले प्रश्न पुढे दिले आहेत.
अ. प्रतिदिन भ्रमणभाषमधील ‘अॅप’मध्ये दैनिक वाचण्यासाठी इंटरनेट किती वेळ वापरावे लागणार ? (म्हणजे ‘दैनिक वाचणार्यांना इंटरनेट डाटा वापरण्याचा व्यय अत्यल्प व्हावा’, हा विचार झाला का ?)
आ. भ्रमणभाष ‘अॅप’मध्ये बातम्या वार्ता किंवा आजचे दैनिक वाचण्यासाठी ‘डेटा कन्टेन्ट’ (वार्तालेखन) कसा आणि किती जण भरणार ? या सेवेसाठी किती साधक असणार ? (म्हणजे या सेवेसाठी साधकांना वेळ अल्प लागणार कि अधिक ?)
इ. दैनिक मोबाइल ‘अॅप’मध्ये एखाद्या दिवशीचे दैनिक दिसणारच नाही, ‘ब्लँक दिसेल’, असे होऊ शकते का ? (म्हणजे डाटा कन्टेन्ट (वार्ता) भरणारा साधक आजारी पडला आणि संगणकावर ऑनलाईन वार्ता भरू शकला नाही, तर वाचकांना त्या दिवशीचे दैनिक भ्रमणभाषवर वाचायला मिळणार नाही का ? यासाठी काही उपाययोजना आहे का ?)
‘भ्रमणभाष ‘अॅप’मध्ये काही ब्लॅन्क दिसू नये’, यासाठी ‘कॅचिंग’ ही ‘कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगची कन्सेप्ट’ असते. ती आम्ही पहिल्या ‘अॅप रीलीज’मध्ये घेतली नव्हती. परात्पर गुरुदेव अप्रत्यक्षपणे त्याचे महत्त्व माझ्या लक्षात आणून देत होते. ‘त्याचा विचार झाला पाहिजे’, हे शिकवत होते.
मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यानंतर त्यांना विचारले, ‘‘यामध्ये अजून काही सुधारणा करायच्या का ?’’
तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘भ्रमणभाषवर दैनिक वाचता येणार’, हे माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडचे आहे !’’ खरेतर त्यांनी विचारलेल्या कल्पनेपलीकडील प्रश्नांतूनच त्यांची सर्वज्ञता जाणवत होती, तरीही त्याचे श्रेय ते स्वतःकडे घेत नव्हते. यातूनच त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. या प्रसंगातून मला त्यांची ‘जिज्ञासू आणि खोलवर जाऊन विचार करण्याची वृत्ती’, हे गुण शिकायला मिळाले. ‘१४ विद्या आणि ६४ कला जाणणारे प.पू. गुरुदेव लाभले’, यासाठी माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली !
– एक साधक