बांगलादेश आणि नेपाळ येथील पुनरावृत्ती भारतात कधीही होणार नाही !

श्री. अभिजित जोग (उजवीकडे वर्तुळात)

बांगलादेशात वापरलेले विद्यार्थी आंदोलनाचे तेच ते ‘टूलकिट डीप स्टेट’ (प्रस्थापित सत्ता उलथवून टाकण्यासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंत्रणा) भारतात कसे वापरत आहे, याचे आणखी एक उदाहरण. तिएन आन मेन चौकात चिनी साम्यवाद्यांनी तरुणांवर रणगाडे घालून सहस्रोंना मारून टाकले. त्या वेळी एक तरुण रणगाड्यासमोर निर्भयपणे उभा असल्याचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले होते. त्याची भ्रष्ट नक्कल करण्यासाठी एका तरुणीला पोलीस व्हॅनसमोर उभे करून खोट्या निर्भयतेचे नेमके छायाचित्र टिपत ते प्रसारित करण्याची चलाखी ‘डीप स्टेट’ने बांगलादेशात दाखवली होती. त्या नकलेची नक्कल आता मुंबईतील ‘कॉकरोच’च्या आंदोलनात केली गेली. त्यांच्या दुर्दैवाने अशा कितीही हास्यास्पद क्लृप्त्या लढवल्या, तरी बांगलादेश आणि नेपाळ येथील पुनरावृत्ती भारतात कधीही होणार नाही; कारण देशातील ‘सायलेंट मेजॉरीटी’ (शांत असलेले बहुसंख्य) मोदींच्या मागे ठामपणे उभी आहे.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२४.७.२०२६)