लेकुरवाळा आणि भक्तवत्सल विठ्ठल !

१. वैष्णवांचे आराध्य श्री विठ्ठल हे विष्णूचेच रूप होय. ‘या विठ्ठलाने समस्त जिवांतील शिव एकच आहे’, हे पटवून दिले.

२. ‘मातापित्याची सेवा हीच परमेश्वरभक्ती’, हा भाव दृढ करण्यासाठी तो भक्त पुंडलिकाच्या भेटीस पंढरपूरला आला आणि २८ युगे तो भक्तांचा उद्धार करत आहे.

३. विठ्ठलाने प्रत्येक जिवातील शिवाचे दर्शन घडवले. हा सगळा पसारा त्याचाच आहे. ही सारी त्याचीच लेकरे आहेत. त्याच्या काही लेकरांचा महिमा जगभर आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत बंका, संत नामदेव, जगद्गुरु संत तुकोबा, संत जनाबाई ! या सर्वांनी भक्तीचा मार्ग प्रदान करून लोकांचे जीवन आनंदी केले. या विठ्ठलाचा परिवार एवढा विशाल आहे की, तो लेकुरवाळा ठरला आहे !  त्याच्याजवळ भेदभाव नाही.

४. ‘परमेश्वराच्या दारी सगळे जीव सारखेच’, हे पंढरपूरची वारी सिद्ध करते. समस्त जाती, पंथ आणि धर्म यांतील लोक वारीत येतात. असा हा सर्वांना कवेत घेणारा लेकुरवाळा विठ्ठल !

(साभार : संकेतस्थळ)