सरन्याधिशांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्यासाठी आलेल्या प्रबल प्रताप नावाच्या एका पक्षकाराने न्यायमूर्तींशी वाद घातला आणि न्यायालयात कागदपत्रे भिरकावली. तसेच सरन्यायाधिशांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचार्यांच्या साहाय्याने न्यायालयाबाहेर काढण्यात आले.
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील एका अतिरिक्त पोलीस आयुक्ताविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश मिळावा, या मागणीसाठी प्रबल प्रताप सर्वोच्च न्यायालयात आला होता. त्याच्या प्रकरणाची सुनावणी न्या. के.व्ही. विश्वनाथन् आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपिठासमोर चालू होती. त्याने न्यायालयालाच आदेश देण्याच्या स्वरात बोलणे चालू केले. ‘मी तुम्हाला आदेश देतो’ असे वक्तव्य केले. यावर न्यायमूर्ती विश्वनाथन् यांनी आश्चर्य व्यक्त करत, ‘तुम्ही आम्हाला आदेश देत आहात का?’ असा प्रश्न केला. त्यावर प्रबल प्रताप याने बोलणे चालूच ठेवले आणि आपण सर्वोच्च सत्ताधारी असल्याचे सांगितले. त्याने अचानक हातातील कागदपत्रे न्यायालयात भिरकावली.
सर्वोच्च न्यायालयाचा कारवाई करण्यास नकार !
या प्रकरणात न्यायमूर्ती विश्वनाथन् म्हणाले की, ‘आम्ही त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. जिथपर्यंत प्रकरणाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे, आम्ही कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. आम्हाला आक्षेप घेतलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही ठोस कारण आढळलेले नाही. विशेष रजा याचिका फेटाळण्यात येत आहे. प्रबल प्रताप फार अस्वस्थ आहेत. हा सगळा उद्वेग आहे. आम्हाला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे.’
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !