भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई – गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. गोमाता ही केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा देण्यात आला असला, तरी गोतस्करी आणि अवैध गोहत्या यांच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा घंटा चर्चेत गोवंश रक्षणाचे सूत्र तळमळीने आणि अभ्यासपूर्ण रितीने मांडले. यासह आमदार मुनगंटीवार यांनी ‘राज्य गोसेवा आयोगा’ला दिवाणी न्यायालयाचे अधिकार द्यावेत, गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने कायमस्वरूपी जप्त करावीत, सीमावर्ती तपासणी नाक्यांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवावेत आणि कारवाईसाठी विशेष पोलीस पथके स्थापन करावीत, तसेच प्रत्येक गोवंशियांसाठी ‘यूआयडी टॅगिंग’ (ओळख क्रमांक) सक्तीचे करावे, अशा मागण्या केल्या.
कठोर कारवाई करण्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन
आमदार मुनगंटीवार यांच्या मागण्यांची नोंद घेत राज्य सरकारने गोवंश संरक्षण कायदा अधिक कठोर करण्याचे, तसेच या प्रकरणी पुढील ३ महिन्यांच्या आत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.
‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ची यापुढे ‘गोवा मेरीटाइम बोर्ड’ म्हणून ओळख
पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी अनुदानित आणि खासगी शाळांकडे
केवळ ओळखपत्रधारकांनाच मासेविक्रीची अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !
१७ वर्षे लेखापरीक्षणाचा अहवाल न देणार्या वक्फ मंडळावर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत !
सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी