केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालातून माहिती प्राप्त

सरकारी शाळांत इयत्ता पहिलीतील एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २०.८ टक्के विद्यार्थी
पणजी, ९ जुलै (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीतील एकूण प्रवेशांपैकी केवळ २०.८ टक्के विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यु.डी.आय.एस्.ई. – २०२५-२६’च्या अहवालात देण्यात आली आहे. राज्यात ६३९ सरकारी प्राथमिक शाळा असूनही ही स्थिती आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार इयत्ता पहिलीतील एकूण २० सहस्र ९१९ नवीन प्रवेशांपैकी केवळ ४ सहस्र ३६३ विद्यार्थ्यांनी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये, ११ सहस्र ४५५ विद्यार्थ्यांनी अनुदानित शाळांमध्ये आणि ५ सहस्र ७०१ विद्यार्थ्यांनी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. राज्यातील एकूण शाळांपैकी ५२ टक्के शाळा सरकारी असल्या, तरी त्यामध्ये राज्यातील केवळ १३.७४ टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावरून पालकांचा कल अनुदानित आणि खासगी शाळांकडे असल्याचे स्पष्ट होते.
इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत राज्यातील एकूण २ लक्ष ९७ सहस्र ३३७ विद्यार्थी विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यांपैकी ४० सहस्र ८४८ विद्यार्थी सरकारी शाळांमधून, १ लक्ष ६१ सहस्र ५८७ विद्यार्थी अनुदानित शाळांमधून, ९० सहस्र २५२ विद्यार्थी खासगी विनाअनुदानित शाळांमधून आणि उर्वरित विद्यार्थी इतर प्रकारच्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. राज्यात एकूण १ सहस्र ४७३ शाळांपैकी ६३९ सरकारी शाळा, ७७१ अनुदानित शाळा आणि ५०१ खासगी विनाअनुदानित शाळा आहेत.
पूर्व-प्राथमिक स्तरावर एकूण २८ सहस्र ८२५ विद्यार्थ्यांपैकी ३ सहस्र ५६ विद्यार्थ्यांनी सरकारी, १६ सहस्र ७४८ विद्यार्थ्यांनी अनुदानित आणि ९ सहस्र २१ विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्राथमिक स्तरावर एकूण १ लक्ष १२ सहस्र १६१ विद्यार्थ्यांपैकी २१ सहस्र १०५ विद्यार्थ्यांनी सरकारी, ६८ सहस्र ४५५ विद्यार्थ्यांनी अनुदानित आणि २२ सहस्र ६०१ विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. माध्यमिक स्तरावर एकूण ४६ सहस्र ५२६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४ सहस्र ९३८ विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर उच्च माध्यमिक स्तरावर सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३ सहस्र ७२२ आहे.
संपादकीय भुमिका :
|
कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण
‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ची यापुढे ‘गोवा मेरीटाइम बोर्ड’ म्हणून ओळख
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती
केवळ ओळखपत्रधारकांनाच मासेविक्रीची अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !
गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करा !