सजावट करणार्यावरही कारवाई होणार
(कूप म्हणजे २ प्रवाशांसाठी स्वतंत्र बंदिस्त कक्ष)

जालना – एका नवविवाहित जोडप्याच्या मधुचंद्रासाठी नंदीग्राम एक्सप्रेसमधील प्रथम श्रेणी कूप सजवल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. यानंतर रेल्वे विभागाने याची गंभीर नोंद घेत तिकीट तपासनीसाला तात्काळ निलंबित केले.
या प्रकरणी रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६ जुलै २०२६ या दिवशी हे नवविवाहित जोडपे गाडी क्रमांक ११००२ नंदीग्राम एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. या जोडप्याने एका खासगी सजावटकाराला (‘डेकोरेटर’ला) सजावट करण्याची ‘ऑनलाईन ऑर्डर’ दिली. त्यानुसार ही गाडी जालना स्थानकावर आली असतांना सदर सजावट करणार्याने रेल्वेत येऊन या कूपाची सजावट केली. त्याने रेल्वेचा संपूर्ण डबाच एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा सजवला. डब्यात रंगीबेरंगी फुगे, सुगंधी फुले, गुलाबाच्या पाकळ्या, ‘एलईडी फेअरी लाईट्स’ आणि लाल रंगाचे पडदे लावले. यासह या जोडप्याच्या आसनाजवळ प्रेमसंदेशही लिहिला. त्यांच्या आसनासह डब्यातील संपूर्ण जमीन गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून गेली होती.
रेल्वे अधिकार्यांच्या मते, या सजावट करणार्याला रेल्वेत प्रवेश देणे पूर्णपणे अवैध होते. त्यामुळे त्याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर तिकीट तपासनीसाने त्या सजावट करणार्याला गाडीत चढण्यापासून रोखायला हवे होते. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.
उपचारात विलंब झाल्याने सूर्या सह्याद्री रुग्णालयाच्या विरोधात तक्रार नोंद !
धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !
‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !
गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करा ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप