भोपाळ (मध्यप्रदेश) – रेल्वेच्या चालकाने, म्हणजेच ‘लोको पायलट’ने चक्क समोसा खाण्यासाठी रेल्वे थांबवली. यासंदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या प्रकरणी सदर चालकाची चौकशी केली जाणार असून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे.
या व्हिडिओत रेल्वे रुळावर उभी असल्याचे दिसत आहे. त्या वेळी ‘रेल्वेच्या चालकाने मध्येच रेल्वेगाडी थांबवून समोशाच्या दुकानात जाऊन सामोसे खरेदी केले. समोशांची पिशवी घेऊन तो पुन्हा रेल्वेत बसला. त्यानंतर थोड्या वेळाने रेल्वे चालू झाली’, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘रेल्वेच्या चालकाने कोणत्या अधिकाराखाली रेल्वे थांबवली ? त्याला रेल्वे थांबवण्याचा आदेश मिळाला होता का ? रेल्वे कुठे आणि किती वेळ थांबवायची ?, याचा नियम आहे. आदेश आल्याविना रेल्वे कुठेही मध्येच थांबवता येत नाही. असे असतांना चालकाने ती मध्येच कशी थांबवली ?’, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले