कोलकाता (बंगाल) – येथील संबारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह सापडल्यावर संतप्त जमावाने संशयित बलात्कार्याला ठेचून मारले.
१. संबारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात सापडला. ही मुलगी ५ जुलैला तिच्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली होती; मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. मुलीच्या कुटुंबियांनी ‘४ जणांनी तिचे बलपूर्वक अपहरण केले’, असा आरोप केला. मुलीचा मृतदेह सापडल्यावर जमाव संतप्त झाले आणि त्याने संशयिताला ठार मारले.
२. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने हिंसक आंदोलन करत रस्ते अडवले, टायर जाळले आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.
३. प्रेसिडेन्सी रेंजचे पोलीस महानिरीक्षक कंकणप्रसाद बारुई यांनी या घृणास्पद गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले आणि त्यानंतरच जमावाने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास संमती दिली.
४. शवविच्छेदनानंतरच मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता का ?, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
महाभारतातील पौराणिक कथा जागतिक पातळीवर नेणार्या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचे निधन
Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’
Group Captain Asim Tariq Murder : पाकिस्तानच्या वायूदलाच्या ग्रुप कॅप्टनची दिवसाढवळ्या हत्या