PM Modi Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यापूर्वी जिवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जुलै या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दौर्‍याच्या काही दिवस आधी त्यांना अबू मुस्तफा नावाच्या फेसबूक खात्यावरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचे ‘ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस’ अन्वेषण करत आहेत.

१. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी ९ जुलै या दिवशी मेलबर्नमधील ‘मार्वल स्टेडियम’वर होणार्‍या ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमात उपस्थित रहाणार आहेत. या सामुदायिक कार्यक्रमाची माहिती देणार्‍या एका फेसबूक खात्याच्या खाली एक अभिप्राय देण्यात आला होता. त्यात ही धमकी देण्यात आली होती.

२. अबू मुस्तफा याने अभिप्राय व्यक्त करतांना म्हटले होते की, ‘कार्यक्रमाच्या वेळी स्टेडियमचे छत बंद ठेवलेले बरे, अन्यथा ते मोदी त्यांचा मृत्यू व्हावा, यासाठीच  ऑस्ट्रेलियात येत आहेत.’

३. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार कोणत्याही देशाच्या प्रमुखांना दिल्या जाणार्‍या धमक्या तेथील कायदा सुव्यवस्था यंत्रणांकडून अत्यंत गांभीर्याने घेतल्या जातात. महनीय व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दौर्‍यांसाठीच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये ‘ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस’, राज्य पोलीस आणि विशेष संरक्षक सुरक्षा पथकांसह अनेक यंत्रणांचा समावेश असतो.