ख्रिस्ती समुदायाचा प्रतिनिधी म्हणून आयवन डिसोझा यांना मंत्रीपद द्या !

कॅथॉलिक सभेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (मध्यभागी )

उडुपी (कर्नाटक) – कॅथॉलिक सभा उडुपी आणि मंगळुरू या विभागांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेऊन विभागाच्या वतीने विधान परिषद सदस्य आयवन डिसोझा यांना ख्रिस्ती समुदायाकडून मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली.

किनारपट्टीवर ख्रिस्ती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे आयवन डिसोझा यांनी दोनदा विधान परिषद सदस्य म्हणून, तसेच परिषदेचे मुख्य प्रतोद (संसद किंवा विधीमंडळ या ठिकाणी संबंधित पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी नेमलेला पक्षप्रमुख) म्हणून आणि ख्रिस्ती विकास महामंडळात विविध दायित्व सांभाळले आहे. काँग्रेस पक्षाच्या विजयात ख्रिस्ती समुदायाचे योगदान मोठे असून राज्यातील २२ जिल्ह्यांत ख्रिस्ती समुदायाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे, असे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदू देशातील ९ राज्यांत अल्पसंख्यांक आहेत, तेथे कधी ते अशी मागणी करतात का ? किंवा त्यांना प्रतिनिधित्व दिले जाते का ?