गुरुदेवांच्या भावभेटीतील भावानंदाचा आविष्कार !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची सनातनच्या संतांशी झालेली भावभेट म्हणजे भावावस्थेचे परमोच्च क्षणच ! संतांसाठी गुरुदेव म्हणजे साक्षात् सगुण रूपातील भगवंतच ! भक्त आणि भगवंत यांच्या या भेटी पहाणे आणि अनुभवणे हा साधना करणार्‍या प्रत्येकासाठी एक भावसोहळाच ठरतो ! गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता, शरणागती आणि भाव यांचे आदर्श उदाहरण असणारे सनातनचे संत हे साधना करून ईश्वराला अनुभवू पहाणार्‍या प्रत्येक साधकासाठी आदर्श आहेत. ईश्वरप्राप्तीच्या, म्हणजेच आनंदप्राप्तीच्या मार्गावरून जातांना या संताप्रमाणे आपल्या हृदयमंदिरातही भावाचे कमलपुष्प उमलावे यासाठी गुरुदेवांच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करूया !

मी तो एक नर भाग्यवान खरा ।
सद्गुरुश्री डोळा देखियेला ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटल्यावर भावस्थिती अनुभवतांना उजवीकडे पू. सदाशिव (भाऊ) परब (वर्ष २०२०)

गुरु भक्तीदाता माय ताता ।
करी कृपेची साऊली ।।

पू. शंकर गुंजेकर यांना साक्षात् गुरूंनी दिलेले आलिंगन ही जीवनभराची भावभेट ! (वर्ष २०१६)

भक्ती कळी ही उमले ।
मधुवास दंग झाले ।।

‘ही तहान-भूक  ना  राहे । अचल चित्त राहे ।
गुरुवाचूनी दुसरे दैवत जगी ना हे ।।’

अशी अवस्था अनुभवास देणारी पू. विनायक कर्वे यांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सर्वस्व वाहिल्याप्रमाणे झालेली स्थिती ! ‘गुरुदेवांनी हातात हात घेऊन त्यांचा केलेला स्वीकार’ ही भावभेट पहाणार्‍याचा भाव जागृत करते ! (वर्ष २०१९)

तव प्रीतीचे मोल कुणाला ।
कळले ना प्रभु अज्ञानाला ।।

गुरुभेटीनंतर ‘नाथांचा नाथ माझा ।
देई शांती या मनाला चरणासी लीन व्हाया ।।’

अशीच अवस्था प्रत्येक शिष्याची होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी झालेल्या संवादानंतर पू. महेंद्र क्षत्रीय यांच्या मुखमंडलावर दिसणारे पूर्ण समाधान गुरूंची भावभेट कशी अविस्मरणीय असते, हेच दर्शवते ! (वर्ष २०१९)