पावसाळा चालू झाल्यापासून १०० हून अधिक वृक्ष कोसळले !

तुर्भे – शहरात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे १३ दिवसांत १०० हून अधिक वृक्ष कोसळले. एकाच दिवशी ३२ ठिकाणी वृक्ष कोसळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात धोकादायक स्थितीतील वृक्षाची माहिती उद्यान विभागाला माहिती नव्हती. कोणत्या प्रजातीची, किती वर्षे जुनी आणि कोणत्या भागातील झाडे धोकादायक आहेत, याचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात मोठ्या झाडांखाली वाहन उभे न करण्याचे, अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आणि धोकादायक झाडे दिसल्यास तातडीने महापालिका किंवा अग्नीशमन दलाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.