अपक्ष आमदार किरण सरनाईक शिवसेनेचे सहयोगी सदस्य !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – अमरावती विभागाचे अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

आमदार सरनाईक म्हणाले की, अमरावती विभागातील मतदारसंघाच्या विकासासाठी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पश्चिम विदर्भातील शिक्षक आणि सुशिक्षित वर्ग यांच्यात शिवसेनेचा जनाधार भक्कम होण्यास साहाय्य होणार आहे.