
नवी मुंबई, २ जुलै (वार्ता.) – मुसळधार पावसामुळे तुर्भे येथील रहिवासी वस्तीत पाणी तुंबल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. वाशी-तुर्भे लिंक रोडपासून १ ते दीड मीटर खाली सखल भागांमध्ये हा परिसर वसवण्यात आला आहे. परिणामी पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे आणखी २ – ३ फूट खाली आहेत. त्यामुळे येथे थोड्याशा पावसातही पाणी साचते. महानगरपालिकेने सखल भागातील पाणी गटारात सोडण्यासाठी पंप बसवले आहेत; पण पंप वेळेत चालू न केल्याने काही काळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पंप चालू केल्यानंतर पाणी हळूहळू ओसरले. त्यामुळे सुदैवाने येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले नाही; मात्र रस्त्यांमध्ये पाणी साचले होते.
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू !
बलात्कारी आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !
मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री
गिरी येथे मुसळधार पावसात बंधारे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल
कुडाळच्या आठवडा बाजारात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मांडले दुकान !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !