शामली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराचे आणखी एक प्रकरण उघड
२२ एकर भूमी नावावर करण्यासाठी मुसलमान तरुणीचा दबाव !

शामली (उत्तरप्रदेश) – आयुष मलिक याचे मुसलमान तरुणीने धर्मांतर केल्याचे प्रकरण ताजे असतांना आता येथे आणखी एक धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. भाऊखेडा गावचे रहिवासी असलेल्या हिंदु व्यक्तीने एका मुसलमान तरुणीवर त्यांच्या मुलाचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. मुसलमान तरुणी भ्रमणभाषवरून २२ एकर भूमी तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत आहे आणि तसे न केल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे, असा आरोप या हिंदु व्यक्तीने केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
१. पीडित हिंदु तरुणाच्या वडिलांचा आरोप आहे की, सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला सहारनपूरची रहाणारी एक मुसलमान तरुणी स्वतःसोबत घेऊन गेली होती. तरुणीने त्याचे धर्मांतर केले असून आता तो इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.
२. पीडित तरुणाच्या कुटुंबाने नुकतेच बघरा येथील साधना पीठ आश्रमाचे पीठाधीश्वर स्वामी यशवीर महाराज यांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. यशवीर महाराज यांनी या सूत्रावर व्हिडिओ प्रसारित करून पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
३. पोलीस अधीक्षक एन्.पी. सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन झिंझाना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
माण (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २३ गोवंशियांची सुटका !
भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !
‘व्हॉट्सप’ची नवीन ‘युझरनेम’ सुविधा प्रारंभ करण्यास केली मनाई
बिहार : हिंदु मुलींना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्या रेहान अन्सारी याच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद
बेंगळुरू पोलिसांनी शहरातील १२ बांगलादेशी घुसखोरांना घेतले कह्यात !