महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन
सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा !
मुंबई – महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणार्या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांची विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली.
पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कारासाठी पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी गायन-संगीत क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रतिवर्षी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ८ सप्टेंबर किंवा त्या दिनांकाच्या जवळ प्रदान करण्यात येईल.
भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख !
मंत्री अधिवक्ता शेलार म्हणाले, आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर आणि असाधारण व्यक्तिमत्त्व असून त्यांनी ८ दशकांहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमध्ये गायन करत संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. विशेषतः मराठीतील बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी आणि लोकसंगीत यांना त्यांनी आवाजाने समृद्ध केले. त्यांच्या गायकीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून त्यांची कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.

‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा तूर्तास पुढे ढकलला
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री
भंगारच्या गाड्यांवर ठपका !