क्षुल्लक वादातून इराणी टोळीकडून हिंदूला मारहाण !

ए.आय.निर्मित चित्र

कल्याण – कट मारल्याच्या (मागील वाहनाला अडवून वाहन पुढे नेल्याच्या) कारणावरून झालेल्या वादातून २ – ३ इराणी तरुणांनी रिक्शातून प्रवास करणार्‍या भावेश पाटील यांना पुष्कळ मारहाण केली. यात ते घायाळ झाले. ही घटना आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात रात्री १० वाजता घडली. या वेळी भावेश यांच्या पत्नीलाही त्यांनी धक्काबुक्की केली. भावेश यांची सोन्याची साखळीही त्यांनी चोरली. या प्रकरणी भावेश यांनी तक्रार प्रविष्ट केली असून संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भावेश यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत; मात्र या घटनेमुळे आंबिवली परिसरातील इराणी टोळीची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.

आंबिवलीतील इराणी वस्ती ही चोरट्यांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे. ‘दहशत माजवणार्‍या इराणी टोळीविरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.