
पुणे – ‘पुणे सार्वजनिक सभा’ या संस्थेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ हा हिंदुत्वासाठी व्यापक कायदेशीर लढाईत योगदान देणार्या हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना घोषित झाला होता. हा नियोजित सोहळा शुक्रवार, ३ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता सदाशिव पेठ येथील वेदशास्रोत्तेजक सभागृहात, विधीज्ञ नंदकुमार फडके यांच्या शुभहस्ते पार पडणार होता. हा पुरस्कार वितरण सोहळा काही अपरिहार्य कारणांमुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील नियोजित स्थळ, वेळ आणि दिनांक लवकरच कळवण्यात येईल, असे विश्वस्त मंडळ, सार्वजनिक सभा, पुणे यांनी कळवले आहे.
राज्यात ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करणार !
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री
भंगारच्या गाड्यांवर ठपका !