गोरक्षक आणि मानद प्राणी कल्याण अधिकारी अवधूत धुमाळ यांची धाडसी कारवाई !
माण (जिल्हा सातारा) – येथील टाकेवाडी गावाच्या हद्दीत श्रीक्षेत्र सतोबा मंदिराच्या पायथ्याशी एका बंद घरामध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवलेल्या २३ गोवंशियांची गोरक्षकांनी सुटका केली आहे. या प्रकरणी मानद प्राणी कल्याण अधिकारी आणि गोरक्षक श्री. अवधूत धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्री. अवधूत धुमाळ यांना माहिती मिळाली होती की, सर्वश्री विठ्ठल मोहिते आणि शिवाजी बळीप यांच्या मालकीच्या बंद घरात काही अज्ञात व्यक्तींनी जनावरे डांबली आहेत. धुमाळ यांनी तातडीने सहकारी गोरक्षक श्री. दिनेश पवार आणि पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. त्या बंद घरातून गोवंशियांच्या ओरडण्याचा मोठा आवाज येत होता. कसायांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने २२ जर्सी गायींची वासरे आणि १ देशी गायीचे वासरू असे एकूण २३ गोवंशीय कोंडून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ दरवाजा उघडून या सर्व गोवंशियांची सुटका केली आणि त्यांना पुढील संगोपनासाठी गोशाळेत सुरक्षितपणे रवाना केले. (पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सतोबा मंदिराच्या परिसरात वासरांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्याचे धाडस कसाई करतातच कसे ? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही असे अवैध प्रकार सर्रास चालू आहेत. हे पोलिसांचा धाक संपल्याचे आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. – संपादक)

भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !
‘व्हॉट्सप’ची नवीन ‘युझरनेम’ सुविधा प्रारंभ करण्यास केली मनाई
मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाचे केले बलपूर्वक धर्मांतर !
बिहार : हिंदु मुलींना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्या रेहान अन्सारी याच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद
बेंगळुरू पोलिसांनी शहरातील १२ बांगलादेशी घुसखोरांना घेतले कह्यात !