
कोल्हापूर – समाजात सामाजिक मूल्ये, राष्ट्रीय जाणीव आणि सकारात्मक विचारांची जोपासना करण्यासाठी ‘विश्व हिंदु परिषदे’च्या वतीने आगामी काळात जिल्हाभर व्यापक संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्रीय मंत्री आणि प्रचारक भाऊराव कुदळे यांनी दिली. कोल्हापूर येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित विश्व हिंदु परिषदेच्या कोल्हापूर विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी विभागपालक धनाजी शिंदे, श्रीकांत पोतनीस, जिल्हाध्यक्ष शांतीभाई लिंबाणी, जिल्हामंत्री विनय बारड उपस्थित होते.
या बैठकीत धनाजी शिंदे यांनी सर्व प्रखंडांनी ४ जुलैपर्यंत संघटनात्मक नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना केली. या बैठकीस अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, राजेंद्र मकोटे, अर्चना रानडे, अश्विनी ढेरे यांसह कोल्हापूर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, वडगाव, पन्हाळा, हुपरी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा तूर्तास पुढे ढकलला
राज्यात ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करणार !
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री