‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद

कर्नाटक काँग्रेसची हास्यास्पद गरळओक

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – श्रीराममंदिराच्या निधीतील अनुमाने २०० कोटी रुपयांची लूट झाल्याचा दावा करत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मौन बाळगल्याच्या प्रकरणी टीका केली. ते म्हणाले की, पूर्वी भारताच्या मंदिरांवर आक्रमणे करून संपत्ती लुटणार्‍या इतिहासप्रसिद्ध आक्रमक महंमद गझनी आणि सध्या सत्तेत असलेले मोदी-शहा यांच्या जोडीत काहीही भेद नाही. धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवणार्‍यांनी जनतेच्या पैशांच्या अपवापरावर मौन बाळगणे, हेच त्यांची वास्तविकता दर्शवते, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

मंदिरांची संपत्ती लुटता यावी, म्हणून राज्यघटनेत कलम २५ आणि २६ यांत संदिग्धता ठेवत मंदिरांचे सरकारीकरण काँग्रेसनेच केले. त्या माध्यमातून मंदिरांतील कोट्यवधी रुपयांचा देवनिधी काँग्रेसवाल्यांनी लाटला. यावर काँग्रेस कधीच काही बोलणार नाही !