साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !

सर्वत्रच्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

‘अनेक साधक वैयक्तिक कारणांसाठी अथवा विविध सेवांच्या निमित्ताने दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करत असतात. दिवसभरातील काम किंवा सेवा यांचा वेळ वाचावा; म्हणून साधक रात्री लांबचा प्रवास करतात. सध्या आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता साधकांनी रात्री वैयक्तिक गाडीने लांबचा प्रवास करणे टाळावे, उदा. गोवा ते पुणे. 

अपवादात्मक परिस्थितीत / काही अपरिहार्य कारणामुळे रात्री प्रवास करणे अत्यावश्यक असल्यास साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील पुढील उपाय करावेत.

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

१. लिंबांनी वाहनाची दृष्ट काढणे 

मोठ्या किंवा महत्त्वाच्या प्रवासाला जातांना ५ लिंबांनी वाहनाची दृष्ट काढावी. वाहनाच्या प्रत्येक चाकाखाली एक, याप्रमाणे ४ लिंबे ठेवावीत आणि पाचवे लिंबू वाहनाला ओवाळून ते वाहनासमोर ठेवून टाचेखाली फोडावे. त्यानंतर वाहन पुढे न्यावे आणि प्रवासाला आरंभ करावा. वाहन पुढे नेल्यावर चाकाखाली ठेवलेली चारही लिंबे फुटतील. फुटलेली लिंबे वहात्या पाण्यात विसर्जित करावीत.

२. वाहनात उपायांसाठी १ लिंबू ठेवावे. प्रवास झाल्यावर ते लिंबू वहात्या पाण्यात विसर्जित करावे.

३. प्रवास करतांना चालक-साधक आणि इतर साधक यांनी मनातल्या मनात नामजप चालू ठेवावा.

४. प्रवास करतांना वाहनात बारीक आवाजात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने किंवा नामजप लावावा.

५. प्रवासात चालक-साधकाला झोप येत असल्यास त्याने गाडी बाजूला लावावी. डोळ्यांवर पाणी मारून डोळ्यांवरील त्रासदायक आवरण काढावे आणि उपाय करून मगच पुढील प्रवास करावा.

६. वैयक्तिक वाहनाने रात्री शक्यतो एकट्याने प्रवास करू नये. समवेत अन्य एक जण तरी असावा.

टीप – अध्यात्मप्रसाराच्या सेवांसाठी, उदा. ग्रंथप्रदर्शन, सत्संग घेणे इत्यादींसाठी साधक वैयक्तिक गाडीने जवळचा प्रवास करू शकतात.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२८.६.२०२६)

बस किंवा आगगाडी यांनी रात्री लांबचा प्रवास करतांना घ्यायची काळजी !

‘साधक बस किंवा आगगाडी यांनी रात्री लांबचा प्रवास करू शकतात; कारण या वाहनांच्या नियोजित वेळांनुसारच आपल्याला प्रवास करावा लागतो. बसेस किंवा आगगाडी यांनी प्रवास करतांना साधकांनी स्वतःभोवती आणि वाहनाभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी, तसेच प्रवासात नामजप चालू ठेवावा.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२८.६.२०२६)