
१. प्रतिदिन उदबत्तीने वाहनाची शुद्धी करणे
‘प्रतिदिन वाहनाची स्वच्छता झाल्यावर वाहनासमोर उभे राहून उदबत्ती ओवाळावी. वाहनाभोवती उदबत्ती ओवाळून त्याची बाहेरून शुद्धी करावी, तसेच चारचाकी वाहनाच्या आत विभूती फुंकरावी.

२. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी वाहनाची नारळाने दृष्ट काढणे
पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी वाहनाची नारळाने दृष्ट काढावी. वाहनाच्या समोरून ३ वेळा नारळ ओवाळावा. त्यानंतर तो नारळ वाहनासमोर फोडावा. नारळ आडवा फुटायला हवा. जर नारळ उभा फुटला, तर आणखी एका नारळाने दृष्ट काढावी आणि तो वाहनासमोर फोडावा. फोडलेला नारळ पाण्यात विसर्जित करावा.
३. ‘वाहनात देवतांच्या नामजपाचे संरक्षककवच निर्माण व्हावे’, यासाठी वाहनाच्या आत चारही बाजूंना देवतांच्या नामजप-पट्ट्या लावाव्यात.
४. महत्त्वाच्या कामासाठी चारचाकीने जायचे असेल, तर १ लिंबू समवेत न्यावे. काम पूर्ण झाल्यावर ते लिंबू वहात्या पाण्यात विसर्जित करावे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)
(२८.६.२०२६)
वाहनशुद्धीसाठी नामपट्ट्या कशा लावाव्यात ?
१. चारचाकी वाहनात नामपट्ट्यांचे छत लावण्याची पद्धत

१. चालकाच्या आसनासमोर – श्रीकृष्ण
२. चालकाशेजारील आसनासमोर – श्री गणपति
३. चालकाच्या मागील आसनावरील डावीकडील खिडकीच्या वर – श्रीराम
४. चालकाच्या मागील आसनावरील उजवीकडील खिडकीच्या वर – दत्त
५. गाडीच्या मागील आसनाच्या डावीकडे वर – देवी (श्री दुर्गा, श्री अंबा, श्री भवानीदेवी, श्री रेणुकादेवी इत्यादी)
६. गाडीच्या मागील आसनाच्या पाठीमागे वर – शिव
७. गाडीच्या मागील आसनाच्या उजवीकडे वर – मारुति
२. दुचाकी वाहनाला नामपट्ट्या लावण्याची पद्धत
दुचाकी वाहनाच्या पुढच्या भागात ‘गणपति’ आणि मागे ‘श्रीकृष्ण’ या देवतांच्या नामजप-पट्ट्या लावाव्यात.
आश्रमात अधिक वाहने असल्यास त्यांची नारळाने दृष्ट काढण्याची पद्धत !
‘पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी वाहनाची नारळाने दृष्ट काढावी. ज्या आश्रमात अधिक वाहने आहेत, तेथील वाहनांपैकी एक वाहन समोर ठेवावे. त्या वाहनात इतर वाहनांचे क्रमांक असलेली पूर्ण सूची ठेवावी. त्या एकाच वाहनाची पुढीलप्रमाणे दृष्ट काढावी.
वाहनाच्या समोरून ३ वेळा नारळ ओवाळावा. त्यानंतर तो नारळ वाहनासमोर फोडावा. नारळ आडवा फुटायला हवा. जर नारळ उभा फुटला, तर आणखी एका नारळाने दृष्ट काढावी आणि तो वाहनासमोर फोडावा. फोडलेला नारळ वहात्या पाण्यात विसर्जित करावा.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भक्तीभाव
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे.