
एडिनबर्ग (स्कॉटलंड) येथील जगातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या संस्थेत भारताचे प्राचीन शल्यचिकित्सक महर्षि सुश्रुत यांचा ९० किलो वजनाचा भव्य कांस्य पुतळा नुकताच बसवण्यात आला आहे. सहस्रो वर्षांपूर्वी जगाला ‘प्लास्टिक सर्जरी’ आणि शस्त्रक्रियेचे ज्ञान देणार्या भारतीय ऋषींचा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मानला जात आहे. ही केवळ एका पुतळ्याची स्थापना नाही, तर भारताच्या प्राचीन वैद्यकीय वारशाला जागतिक स्तरावर मिळालेली एक ऐतिहासिक पावती आहे !

‘शस्त्रक्रियेचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणार्या महर्षि सुश्रुत यांनी लिहिलेला ‘सुश्रुत संहिता’ हा ग्रंथ केवळ आयुर्वेदाचा भाग नसून तो मानवी इतिहासातील शस्त्रक्रियेवर आधारित पहिला आणि सर्वांत पद्धतशीर ऐतिहासिक नोंद मानला जातो. आज कोणत्याही आधुनिक रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षामध्ये जी नियमावली पाळली जाते, त्याची पायाभरणी सुश्रुतांनी केली होती. ‘सुश्रुत संहिते’च्या ‘सूत्रस्थान’ (अध्याय २५ – ‘अष्टविधशस्त्रकर्मपद्धतीय’ अध्याया) मध्ये ८ प्रकारच्या शस्त्रक्रियांचे अत्यंत सखोल आणि शास्त्रीय वर्णन आढळते. सुश्रुत हे जगातील पहिले असे वैद्य होते, ज्यांनी डोळ्यांमधील मोतिबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली होती. आज पाश्चात्त्य देश ज्या विज्ञानाचा नवा ‘शोध’ म्हणून गौरव करत आहेत, ते ज्ञान आपल्या ऋषींनी सहस्रो वर्षांपूर्वीच केवळ ध्यान आणि कठोर साधना यांच्या बळावर मिळवले होते. ऋषि अगस्तींनी ‘अगस्ती संहिते’त विद्युत् निर्मिती आणि जलशुद्धीकरण यांचे सूत्र दिले होते. ‘सूर्यसिद्धांत’ या प्राचीन ग्रंथात दुर्बिणीविना सूर्य अन् पृथ्वी यांमधील अचूक अंतर मोजून खगोलशास्त्रात क्रांती केली होती. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्ते आणि तथाकथित पुरोगामी यांनी भारताच्या या गौरवशाली परंपरेची उपेक्षा केली. हिंदु धर्मग्रंथ आणि आयुर्वेद हे केवळ ‘पूजा-पाठ’ किंवा ‘अंधश्रद्धा’ नसून ते अत्यंत प्रगत विज्ञान आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्याच या अमूल्य ठेव्याला विसरत चाललो आहोत.
ज्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे आपण अंधाधुंद धावत आहोत, ती संस्कृती स्वतः आपल्या ऋषिमुनींच्या चरणाशी नतमस्तक होत आहे. आतातरी भारतातील आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रमात पाश्चात्त्य पद्धत अंधपणे राबवण्याऐवजी आपल्या या महान पूर्वजांच्या ऋषी-विज्ञानाचा सार्थ अभिमान बाळगून त्याचा अंतर्भाव केला पाहिजे. आता भारतियांनी वैचारिक गुलामगिरी झुगारून गौरवशाली सनातन परंपरेचा, विज्ञानाचा आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगवा !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
न्यायव्यवस्थेवरील टीकेपेक्षा कलाविष्काराला अधिक महत्त्व देणारा तमिळनाडू उच्च न्यायालयाचा निवाडा !
युद्धबंदी झाली; पण प्रश्न कायम !
नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !