रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !

 

रंगपूर (बांगलादेश) – शहरातील प्राणी संग्रहालयाजवळ असलेल्या हनुमतला येथे रतन चंद्र रॉय या हिंदु व्यावसायिकाच्या दुकानाची लूटमार आणि तोडफोड करण्यात आली. या वेळी रॉय यांना विटा आणि शस्त्रे यांनी निर्दयपणे मारहाण करण्यात आली. याचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे.