चेंबूर येथे शालेय बसवर वृक्ष कोसळला : १० विद्यार्थी घायाळ, एका मुलाचा मृत्यू ! 

मुंबई – येथील चेंबूर भागात शाळेच्या धावत्या बसवर अचानक मोठा वृक्ष कोसळला. यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला. या घटनेत १० विद्यार्थी गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांतील एकाचा मृत्यू झाला आहे. घायाळ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.