ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !

सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती

‘आयुष्य होमा’च्या वेळी कलश रूपात करण्यात आलेली शिव-पार्वतीची मांडणी आणि पार्वतीदेवीच्या कलशापुढे पडलेले कमळ फूल

ईरोड (तमिळनाडू) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमध्ये  २५ जून २०२६ या दिवशी ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला. सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘आयुष्य होम’ पार पडला. या होमाच्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या होमाला सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे भक्त श्री. आणि सौ. सोमाण्णा अन् श्री. सुंदरराजनजी हेही उपस्थित होते. ‘आयुष्य होमा’चे पौरोहित्य शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि त्यांचे वडील श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी केले.

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
‘आयुष्य होमा’च्या वेळी आहुती देतांना  श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि  शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.

वैशिष्ट्यपूर्ण क्षण

१. यागाच्या पूजेमध्ये असलेले २ कलश हे शिव-पार्वती यांचे प्रतीक होते. ज्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होम चालू करण्यापूर्वी समई लावायला घेतली, त्या वेळी पार्वतीदेवीच्या कलशावरील कमळाचे फूल खाली पडले. ‘होम चालू होण्यापूर्वीच देवीने शुभ संकेत दिला’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या.

२. होमाची पूर्णाहुती चालू असतांना तेथे एक वानर आले. होमाच्या ठिकाणी येऊन ते पाणी प्यायले आणि त्याला दिलेली केळी त्याने खाल्ली.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक