
प्रश्न – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘३१.१०.२०१७ या दिवसापासून मी वापरत असलेल्या कुलरमधून (शीतकरण यंत्रातून) हळू आवाजात संगीताचा नाद अधूनमधून ऐकू येतो. त्याचे शास्त्र काय ?’ (१.११.२०१७)
उत्तर – श्री. राम होनप :
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा संकल्प आहे. असे झाल्याने सर्वत्र रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून समाज सात्त्विक आणि धर्माचरणी होणार आहे. भविष्यात असे झाल्याने वाईट शक्तींना अधर्माचे कार्य करण्यास पुष्कळ प्रतिरोध होणार आहे. असे होऊ नये, यासाठी पाताळांतील मोठ्या वाईट शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे त्या वाईट शक्तींचा जोर न्यून होतो.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर वापरत असलेल्या शीतकरण यंत्राद्वारे निर्माण होणार्या दैवी संगीताचे कार्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्म युद्ध सतत चालू असते. या सूक्ष्म युद्धाचा परिणाम म्हणून वातावरणातील रज-तम यांत अकस्मात् वाढ होते. याचा परिणाम साधकांवर होतो. त्यामुळे साधकांना ‘ग्लानी येणे, चक्कर येणे, मनःस्थिती अकस्मात् बिघडणे, निराशा आणि निरुत्साह येणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी विकल्प येणे’ इत्यादी त्रास होतात. या त्रासांचे निवारण होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर वापरत असलेल्या शीतकरण यंत्रातून संगीताचा नाद अधूनमधून निर्माण होतो. या दैवी संगीताद्वारे चैतन्याचे सूक्ष्म तरंग वातावरणात निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातील रज-तम यांचा दूषितपणा अल्प कालावधीतच न्यून होतो आणि साधकांना साधना करण्यासाठी शक्ती अन् उत्साह प्राप्त होतात.
२ अ. शीतकरण यंत्रातून निर्माण होणार्या दैवी संगीताची वैशिष्ट्ये
१. दैवी संगीताला ‘नादब्रह्म’, असे म्हणतात. शीतकरण यंत्रातून ऐकू येणारा संगीताचा नाद भगवान शिवापासून निर्माण होतो. या दैवी संगीतात भगवान शिवाची तारक-मारक शक्ती असते. यातील तारक शक्तीमुळे साधकांना साधना करण्याची प्रेरणा मिळते, तर मारक शक्तीमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होते.
२. या दैवी संगीतात मांगल्य असते. मांगल्यामुळे संगीतातील दैवी तरंगांमध्ये आनंदलहरी असतात. त्यामुळे वातावरण मंगलमय होते. असे वातावरण साधकांना साधनेसाठी पूरक असते.
३. शीतकरण यंत्रातून निर्माण होणार्या दैवी संगीताचा नाद लहान आवाजात (हळू) येण्याचे कारण
दैवी संगीतातील लहान आवाजातील (हळू) नादात सूक्ष्मता अधिक असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि वाईट शक्ती यांच्यात चालू असलेला सूक्ष्म युद्धाचा स्तर अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे शीतकरण यंत्रातून दैवी संगीताचा नाद लहान आवाजात (हळू) ऐकू येतो.
४. शीतकरण यंत्राद्वारे संगीताचा नाद निर्माण होण्याचे कारण
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याचा परिणाम ते वापरत असलेल्या शीतकरण यंत्रावर होतो. चैतन्यामुळे शीतकरण यंत्रातील अणूंतील पृथ्वीतत्त्वाशी निगडित जडत्व न्यून होते आणि चैतन्य निर्माण होते. त्या अणूंमध्ये चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे शीतकरण यंत्राचे स्वरूप आणि कार्य हे दैवी बनते. अशा यंत्राद्वारे दैवी संगीताचे प्रगटीकरण सहजतेने आणि ईश्वराच्या अल्प शक्तीत होते. त्यामुळे शीतकरण यंत्राद्वारे दैवी नादाची निर्मिती होते.
५. शीतकरण यंत्रातून संगीताचा नाद निर्माण होण्याची सूक्ष्मातील प्रक्रिया
जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि वाईट शक्ती यांच्यातील सूक्ष्म युद्धाचा परिणाम म्हणून वातावरण नकारात्मक बनते, तेव्हा शीतकरण यंत्रातील चैतन्याचे रूपांतर संगीतमय नादात होते. अशा दैवी संगीताद्वारे चैतन्यातील कलात्मक शक्ती प्रगट झालेली असते. या दैवी संगीतातून सूक्ष्म दैवी तरंग निर्माण होतात आणि ते वातावरणात पसरतात अन् अल्प कालावधीत वातावरणाची शुद्धी होऊन ते हलके होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २०.३.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि एकूण कालावधी : २० सेकंद )
सनातन संस्थेचे अद्वितीय आश्रम !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
खरे सुख कसे मिळते ?