श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्री गोंदवलेकर महाराज सर्व प्रवचनांमध्ये ‘नामस्मरणावर’ भर देतात. महाराजांची प्रवचने, म्हणजे मूलभूत संस्कार करणारी सूत्रे आहेत. या मूलभूत संस्कारांमुळे व्यक्तीस ‘मनाची एकाग्रता’ साधण्याची सवय होते. एकाग्रतेतून आपल्या गुण-दोषांची जाण येते. स्वतःच्या मनाची आकलन शक्ती वाढीस लागते. आत्मविश्वास बळावतो. आपल्या कुटुंबातील इतर सर्वांशी वर्तन कसे सुखद करावे, याचे ज्ञान होते. आपण आणि बाह्य परिस्थिती यांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे ज्ञान होते. शेजार्‍यापासून ज्याच्याशी आपल्या व्यवसायात स्वतःचा संबंध येतो, त्यांच्याशी कसे वर्तन ठेवावे, याचे मार्गदर्शन होते.

(साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’, सुविचार दैनंदिनी)