
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण – वायुतत्त्वाचे सामर्थ्य लक्षात येणे
‘आज व्हरांड्यातून बाहेरच्या दृश्याकडे पाहिले, तर वार्यामुळे १ – २ घंटे पुष्कळ हलणारी अनेक झाडे दिसली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘एका झाडाची एक छोटीशी फांदी हलवायला आपल्याला कितीतरी शक्तीचा व्यय करावा लागतो. साधारणपणे ५ ते १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ फांदी सतत हलत ठेवता येत नाही; कारण आपण दमतो. एक झाड संपूर्णपणे हलवायची क्षमता आपल्यात नसते. वार्यामुळे कित्येक चौरस कि.मी. जागेतील सहस्रो झाडे सहजतेने हलतात.’ यावरून ‘वार्यात केवढे सामर्थ्य आहे आणि मानव निसर्गापुढे किती दुर्बल आहे !’, हे माझ्या लक्षात आले. भूकंपामुळे पृथ्वीतत्त्वाचे, मुसळधार पावसामुळे येणार्या पुरामुळे आपतत्त्वाचे आणि ज्वालामुखीमुळे तेजतत्त्वाचे सामर्थ्य ते प्रसंग दृश्यस्वरूपात असल्यामुळे कळते. वायुतत्त्वाचे सामर्थ्य मात्र वायू अदृश्य असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. ते आजच्या दृश्यामुळे माझ्या लक्षात आले.’ (निज वैशाख शुद्ध १०, कलियुग वर्ष ५११२ (२३.५.२०१०))

२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. पंचतत्त्वांचे वर्गीकरण
२ अ १. अपरोक्ष तत्त्वे : ‘डोळ्यांना दिसणारे किंवा प्रत्यक्ष अनुभवास येणारे’, याला ‘अपरोक्ष’, असे म्हणतात. पंचतत्त्वांपैकी पृथ्वी, आप आणि तेज ही तत्त्वे ‘अपरोक्ष तत्त्वे’ आहेत. भूमी, वस्तू आणि निसर्ग हे घटक पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आहेत. पाणी आपतत्त्वाशी आणि अग्नी तेजतत्त्वाशी संबंधित आहे.
२ अ २. परोक्ष तत्त्व : डोळ्यांच्या पलीकडे अनुभवाला येणार्याला ‘परोक्ष तत्त्व’, असे म्हणतात. पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाला ‘परोक्ष तत्त्व’, असे म्हणतात.
२ अ ३. अस्तित्व : पंचतत्त्वातील आकाशतत्त्वाला ‘अस्तित्व’ स्वरूपात गणले आहे.
२ आ. पंचतत्त्वे आणि त्यांची सूक्ष्मता : पृथ्वीतत्त्व ‘सूक्ष्म’ आहे. आपतत्त्व ‘सूक्ष्मतर’ आहे. तेजतत्त्व ‘सूक्ष्मतम’ आहे. वायुतत्त्व ‘परम सूक्ष्म’ आणि आकाशतत्त्व ‘सर्वाेच्च’ मानले आहे.
२ इ. शरिराचे कार्य आणि पंचतत्त्वे यांचा संबंध : व्यक्तीच्या शरिरातील अन्न (पृथ्वीतत्त्व), पाणी (आपतत्त्व) आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा अग्नी (तेजतत्त्व) यांचे कार्य बिघडले की, व्यक्तीचे आरोग्य बिघडते अन् तिला विविध रोग होतात. शरिरातील वायूचे प्रमाण न्यून होऊ लागल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या प्राणावर होतो. त्यामुळे शरिरात वायूला सर्वाधिक महत्त्व आहे.
२ ई. पृथ्वीचे कार्य आणि पंचतत्त्वे यांचा संबंध : अन्नाचा तुटवडा (पृथ्वीतत्त्वाचा अभाव), पाण्याची न्यूनता (आपतत्त्वाचा अभाव) आणि ज्वालामुखीचा उद्रेक (तेजतत्त्वाचा प्रकोप) झाल्यास त्या त्या ठिकाणची जीवसृष्टी धोक्यात येते. कालांतराने ती परिस्थिती पूर्ववत् होते; परंतु वायू दूषित होऊन त्यात रज-तम निर्माण झाल्यास पृथ्वीवरील सात्त्विकता न्यून होते आणि वाईट शक्तींचे प्राबल्य वाढते. परिणामी समाजात दुःख, अशांतता आणि संघर्ष यांत पुष्कळ वाढ होते अन् ही परिस्थिती दीर्घकाळ टिकते. त्यामुळे सात्त्विक आणि सज्जन लोकांना जीवन नकोसे होते. वायुतत्त्वात सूक्ष्मता असल्याने समाजावर त्याचा परिणाम अधिक होतो.
२ उ. पंचतत्त्वे आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
‘पंचतत्त्वांचे गुणधर्म आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वरील लिखाणाद्वारे ‘पृथ्वी, आप अन् तेज यांचे सामर्थ्य दृश्य स्वरूपात असल्याने ते लक्षात येते; परंतु वायुतत्त्वाचे सामर्थ्य अदृश्य असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही’, असे म्हटले आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)
बुद्धीप्रामाण्यवादी साधनेच्या अभावी आंधळेच असतात !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना अंतर्मुख करणार्या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (वय ५७ वर्षे) !
असेही कलियुगातील आई-वडील !