
आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुसर्या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे. आपल्याकडील वाळवलेले खोबरे घाण्यावर देऊन कोणतीही रासायनिक प्रक्रिया केल्याविना काढलेले तेल मिळाल्यास सर्वांत चांगले. आजकाल योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आस्थापनाचे तेल सर्वत्र उपलब्ध असते. कच्च्या खोबरेल तेलामध्ये लॉरिक ॲसिड’ नावाचा घटक असतो. यामुळे कॉलेस्टेरॉल न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे खोबरेल तेलामुळे कॉलेस्टेरॉल वाढते’, हा निवळ अपसमज आहे. – वैद्य सुविनय दामले

जेवणामध्ये कच्चे खोबरेल तेल वापरल्याने होणारे लाभ
प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणामध्ये १-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घ्यावे, तसेच जेवण झाल्याझाल्या १-२ चमचे हे तेल प्यावे. यामुळे पुढील लाभ होतात.
१. कधीही बद्धकोष्ठता होत नाही. तेलामुळे आतड्यांना चिकटून बसलेला मळ सुटतो आणि आतड्यांची शक्ती वाढते.
२. पचन सुधारते आणि त्यामुळे वाताचा त्रास होत नाही.
३. शरिरातील सर्व सांध्यांना वंगण मिळून हाडांची झालेली झीज भरून येते.
४. खोबरेल तेल थंड असल्याने याने उष्णतेचे विकारही दूर होतात.
५. या तेलामुळे कॅल्शियमची न्यूनता दूर होते. शरीरस्वास्थ्य सुधारल्याने शरीर अन्नातून आपल्याला आवश्यक ते घटक शोषून घेऊ लागते आणि त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची न्यूनता दूर होण्यास साहाय्य होते.
६. शरीर सुदृढ आणि काटक बनते. (कच्च्या खोबरेल तेलामुळे जाडी वाढत नाही.)
खोबरेल तेलाचे आश्चर्यकारक लाभ
१. सातत्याने खोकला येणे, दम लागणे या विकारांमध्ये खोबरेल तेल दिवसातून २-३ वेळा १-२ चमचे प्यावे. यामुळे खोकल्याची ढास लगेच थांबते.
२. धुळीची ॲलर्जी असणार्यांनी दिवसातून ५-६ वेळा खोबरेल तेलाच्या बाटलीत १ करंगळी बुडवून तिला लागलेले तेल नाकपुड्यांना आतून लावावे. यामुळे नाकात येणारी धूळ तेलाला चिकटल्याने श्वसनमार्गात जात नाही आणि धुळीपासून होणारे त्रास न्यून होतात.
३. १ चमचा खोबरेल तेल टाळूवर जिरवावे. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ५-१० मिनिटे थापट्या माराव्या आणि चोळावे.
४. प्रतिदिन अंघोळीपूर्वी शरिराला खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा न्यून होऊन सांध्यांना वंगण मिळते.
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !
Maharashtra Monsoon Session 2026 : पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !