अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्‍यांना कामावरून बडतर्फ करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘चिंबल येथे अनधिकृत कूपनलिका खोदल्याच्या प्रकरणी केलेल्या कारवाईचा ६ जुलैपर्यंत अहवाल देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने जलस्रोत खात्याला सांगितले आहे. या अनधिकृत कूपनलिकांच्या प्रकरणी प्रविष्ट झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हा निर्देश दिला. या वेळी जलस्रोत खात्याचे प्रतिनिधी उच्च न्यायालयाला म्हणाले, ‘‘खात्याने अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात मोहीम आरंभली आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून चिंबल येथील २७ अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.’’ (११.६.२०२६)