
‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे. ‘या अंकाच्या वाचनाने आम्हाला पुढची दिशा आणि मार्गदर्शन मिळते’, असे काही वाचक उत्स्फूर्तपणे सांगतात.
असे असतांनाही ‘प्रथम भेटीतच जिज्ञासूंना वाचक बनण्यास कसे सांगू ? त्यांच्याशी जवळीक साधून नंतर वाचक होण्यासाठी प्रवृत्त करूया’, असे बर्याच साधकांना वाटते. त्यामुळे ते जिज्ञासूंना वाचक होण्यासाठी तत्परतेने उद्युक्त करत नाहीत.
आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.’
(१२.५.२०२६)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !