१२ व्या शतकात परकीय आक्रमण झाल्यामुळे ही भूमी परकीय अधिपत्याखाली गेली. महाराणा प्रताप, लचित बारफुकन, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेकांनी बंड पुकारले. इंग्रजांनी काबुल ते कन्याकुमारी ही भूमी गिळंकृत केली. फ्रेंच-अमेरिकन राज्यक्रांती झाली. जगात दोन जागतिक महायुद्धे झाली, अणूबाँब टाकून लाखो माणसे मारली गेली. जगात आणि भारतात इतक्या घटना घडल्या; पण इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात खाणे, पिणे आणि झोपणे याव्यतिरिक्त काही फरक पडला नाही. या देशातील नागरिकांना सार्वजनिक जीवनात कशानेच काही फरक पडत नाही, विशेष करून ज्यामध्ये आर्थिक-शारीरिक हानी होणार असेल, तिकडून पहिल्या छूट पळून जाणे यात यांचा हातखंडा. त्यामुळेच या देशाने खुदिराम बोस-राजगुरु-अनंत कान्हेरे यांसारख्या क्रांतीकारकांचे बलीदान निर्विकारपणे पचवून टाकले आहे. ब्रिटीश, स्पॅनिश, पोर्तुगीज, अरब यांच्याशी आमचा संबंध शेकडो वर्षांचा आहे आणि एवढ्या कालखंडात त्यांच्या भूमीशी प्रतारणा करून आपल्याला सामील होणारे हाताच्या बोटांपलीकडे सापडणार नाहीत; परंतु वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नीचतम पातळी गाठण्याचे अन् गद्दारीचे जागतिक विक्रम अखंड हिंदुस्थानातील जनतेच्या नावावर आहेत.

१. देशात समाजमाध्यमांच्या माध्यमातून क्रांती घडेल का ?
ज्याला स्वातंत्र्ययुद्ध म्हणवून आपण मिरवतो ते युद्ध, म्हणजे तरी काय, तर प्रतिदिन ब्रिटीश पोलिसांच्या बांबूचे फटके खाऊन त्या सुजलेल्या अंगावर घरी हळद लावणे. आपल्या देशातील लोक याचे वर्णन करतांना म्हणतात की, ‘गांधीजींनी आम्हाला अहिंसेची चळवळ दिली’, हे म्हणजे साफ खोटे. त्याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेक क्रांतीकारक यांनी हिंसेचा क्रांतीमार्गही दिला होताच की; पण त्याही काळात या देशात झुरळांची संख्या एवढी प्रचंड की, त्या झुरळांनी देश झटक्यात स्वतंत्र करण्यासाठी हातात शस्त्रे कधी घ्यावीत ? बरे हा देश ब्रिटीश अधिपत्याखालून काबुल ते कन्याकुमारी स्वतंत्र झाला म्हणावे, तर तेही नाही; कारण आमच्या मराठवाड्यातील जनतेला जगात आणि देशात काय चालले आहे, याचे काही सुवेरसुतक पडले नव्हते. त्यामुळे भारत वर्ष १९४७ मध्ये स्वतंत्र झाला असला, तरी त्यानंतर एक दीड वर्षाने भारतीय पोलीस घुसवून मराठवाडा ताब्यात घ्यावा लागला, तर गोवा स्वतंत्र करायला आणखी १४ वर्षे लागली. अशा या देशात बेसुमार सत्ता, साधने आणि कार्यकर्ते असतांना भाजप-काँग्रेससारख्या पक्षांची भारतभर दमछाक होते, त्या देशात नेपाळ, श्रीलंकेप्रमाणे समाजमाध्यमांच्या माध्यमातून क्रांती घडेल ?
२. ‘कॉकरोच पार्टी’ला राजकीय क्रांती समजणे, ही व्यवस्थेची चेष्टा !
भारतीय राजकारणाचा इतिहास जाणून असणारे समाजकारणी, ‘मिडिया हाऊसेस’ (प्रसारमाध्यमे), राजकीय तज्ञ ‘कॉकरोच पार्टी’च्या काही क्षण खिळवून ठेवणार्या गारुड्याच्या खेळाला राजकीय क्रांती समजत आहेत, ही व्यवस्थेची चेष्टा आहे. भारतीय राजकारण एवढे सोपे असते, तर मग एकेक ग्रामपंचायत, एकेक पंचायत समिती, एकेक जिल्हा परिषद, एकेक वॉर्ड (प्रभाग), एकेक महानगरपालिका, एकेक विधानसभा, लोकसभा जिंकण्यासाठी दिवस-रात्र जनतेच्या समस्या सोडवणारी जनसंपर्क कार्यालये चालवणे, तळहाताच्या रेषा ठाऊक असाव्यात, त्याप्रमाणे तालुका, जिल्हा, राज्यभर दौरे करून इत्यंभूत माहिती ठेवणे, आपल्या सर्वांत तळागाळातील कार्यकर्त्याने रात्री २ वाजता ‘मेसेज’ (लघुसंदेश) केला, तर त्याची तात्काळ नोंद घेणे, कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या घरातील दुखणी-खुपणी सोडवणे, हे कशाला करायला लागले असते ? बस ‘एक्स’, इन्स्टाग्राम यांवर खाते उघडायचे आणि लोक गोळा करून पंतप्रधान व्हायचे अन् हे इतके सोपे असेल, तर मग कुठलीही ‘पॉर्न स्टार’ ही भारताची पंतप्रधान होऊच शकते.
३. देश जिंकायचा, तर…
शेकडो भाषा, पदार्थ, वेशभूषा, धर्म, जाती, असे वैविध्य असलेल्या या देशात ‘एकाचे धुवायला गेलो, तर दुसर्याचे उघड पडते आणि दुसर्याचे धुवायला गेलो, तर तिसरे रुसते’, अशी परिस्थिती आहे. आजच्या परिस्थितीत हा देश जिंकायचा, तर किमान काही सहस्र कोटी रुपये, लाखो समर्पित कार्यकर्ते, वर्षानुवर्षे जोपासलेली विचारधारा, अनेक वर्षांचे कष्ट, काटेकोर नियोजन आणि नशीब यांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी झुरळांना डायनासॉर म्हणून रंगवले, तरी या देशात जगाला दिपवून टाकेल, अशी क्रांती होणे नाही.
– एक धर्मप्रेमी
हिदु धर्माचा झेंडा !
‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !
आदिवासी कि वनवासी ?
केरळम्मधील दीपप्रज्वलनाचा वाद : राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाचा आत्मा संस्कृती कि धर्म ?
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !