‘उत्तरदायी साधक सांगतील त्याप्रमाणे साधना करून साधनेत पुढे जायचे असते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीमती कविता शेट्ये (श्री. रामानंद परब यांच्या सासूबाई) : ‘आता माझ्या मनात येणारे विचार न्यून झाले आहेत. मला आता घरी जाण्याची इच्छा होत नाही.

श्रीमती कविता शेट्ये

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छानच आहे ना ! इथेच रहा !

श्रीमती कविता शेट्ये : ‘मी एवढे प्रयत्न करते, तरीही माझी आध्यात्मिक प्रगती अजून का होत नाही ?’, असा विचार माझ्या मनात येतो.

श्री. रामानंद परब

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असा विचार करायचा नाही. ‘शाळेतील मुलांनी परीक्षेत कितवा क्रमांक येणार ?’, याचा विचार करायचा नसतो, तसेच हे आहे. साधनेत तुम्ही पुढे जाणार. उत्तरदायी साधक सांगतात, त्याप्रमाणे साधना करता ना ?

श्रीमती कविता शेट्ये : हो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हा. आता तुमचे दायित्व नाही. तुम्ही जराही विचार करू नका. उत्तरदायी साधक सांगतील, त्याप्रमाणे करत रहा आणि साधनेत पुढे जा. हे (श्री. रामानंद परब, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे) कसे साधनेत पुढे जात आहेत, तसेच पुढे जायचे.’