
रत्नागिरी – कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद पडली आहे. अतीउच्च गरजेच्या वेळी महाराष्ट्राची विजेची आवश्यकता भागवणारा कोयना वीज प्रकल्प शिवसागर जलाशयातील पाणीसाठा अल्प झाल्यामुळे केवळ अंतर्गत वापरासाठी लागणारी अवघी ४० मेगावॅट वीजनिर्मिती टप्पा १ आणि २ यातून होत असून कोयना वीज प्रकल्पाचा टप्पा ३ आणि ४ पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
कोयना धरणाचे पाणी ‘लेक टॅपिंग’च्या माध्यमातून बोगद्याद्वारे चिपळूणमध्ये आणून विद्युत् जनित्राद्वारे ही वीजनिर्मिती होते. महाराष्ट्र राज्याची विजेची अतीउच्च मागणी ज्या वेळी असते, म्हणजेच सकाळी आणि सायंकाळच्या वेळी कोयना जलविद्युत् प्रकल्प चालवला जातो. सर्वांत स्वस्त आणि कोणतेही प्रदूषण न करणारी वीज मिळण्यासाठी कोयना जलविद्युत् प्रकल्प महाजनकोच्या माध्यमातून चालवला जातो. गतवर्षी सर्वाधिक वीजनिर्मिती या प्रकल्पातून करण्यात आली होती.
कोयना वीज प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पश्चिमेकडील वापरलेले पाणी थेट चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत सोडले जाते. या पाण्यावर मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत; मात्र वीजनिर्मिती बंद झाल्यामुळे वाशिष्ठी नदी पात्रात सोडण्यात येणारे पाणी अत्यंत अल्प झाले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील गावांवर होत आहे.
ठाणे येथे वृद्धाला मारहाण; परप्रांतीय कह्यात !
पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद, २ धर्मांधांना अटक !
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराला दीड किलो सोन्याचा कळस गोव्यातील भाविकाकडून दान
५ रुपयांच्या नोटांसह २० रुपयांची नाणी हे कायदेशीर चलन स्वीकारा ! – जिल्हाधिकारी
थोडक्यात महत्त्वाचे : ११.०६.२०२६
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज ! – डॉ. मैनाक घोष, जिल्हाधिकारी