अनोळखी क्रमांकावरील ‘सायलेंट कॉल’द्वारे होऊ शकते सायबर फसवणूक !
नवी देहली – अनोळखी क्रमांकावरून दूरभाष येणे आणि कॉल उचलल्यानंतर ‘हॅलो’ म्हटल्यावर समोरून लगेच फोन कट होणे, हा प्रकार अनेकांच्या संदर्भात घडत असतो. हा प्रकार ‘सायलेंट कॉल’ फसवणुकीचा प्रकार असण्याची शक्यता असल्याने अशा कॉलकडे दुर्लक्ष न करण्याची चेतावणी गृह मंत्रालयाने दिली आहे.
पुन्हा त्या क्रमांकाशी संपर्क करू नये !
सायबर सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अशा कॉलच्या संदर्भात सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे. कॉल उचलताच तो कट झाल्यास संबंधित क्रमांकाशी पुन्हा संपर्क (फोन) करू नये. वारंवार अशा प्रकारचे कॉल येत असल्यास तो क्रमांक बंदी सूचीत टाकावा, म्हणजेच ‘ब्लॉक‘ करावा. तसेच अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती देणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. दूरसंचार आस्थापनांकडून संशयास्पद क्रमांकांविषयी दाखवण्यात येणार्या सूचना गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फसवणुकीचा संशय आल्यास नागरिकांनी तत्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वरही तक्रार नोंदवावी, असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे.
‘सायलेंट कॉल’ फसवणूक म्हणजे काय ?
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर सुरक्षा संस्थेच्या माहितीनुसार फसवणुकीच्या या प्रकारांर्गत एकाच वेळी सहस्रो भ्रमणभाष क्रमांकांवर स्वयंचलित पद्धतीने फोन करतात. असा फोन करण्यामागे संवाद साधण्याचा हेतू नसतो. संबंधित व्यक्तीने फोन उचलला का ? आणि क्रमांक वापरात आहे का ?, यांची निश्चिती करणे, हा त्यामागील उद्देश असतो. व्यक्तीने फोन उचलताच त्याचा क्रमांक सक्रीय असल्याची माहिती फसवणूक करणार्यांना मिळते. त्यानंतर अशा क्रमांकांवर आर्थिक फसवणूक, बनावट पोलीस कारवाईच्या धमक्या, बँक खात्याची माहिती मागवणे, बक्षीस किंवा लॉटरीच्या नावाखाली जाळ्यात ओढणे, असे फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक