आरोपीला तात्काळ अटक करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

नवी मुंबई – नेरूळ येथे प्राजक्ता वंजारे नावाच्या ख्रिस्ती परिचारिकेने हिंदु देवतांच्या मूर्ती आणि देवघर यांची विटंबना करत देवतांना चपलांच्या मांडणीजवळ फेकून दिले होते. या प्रकरणी तक्रारदार हिंदु महिलेचे बंधू श्री. हर्षद पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधला. समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा समन्वयक सौ. प्रवीणा पाटील, श्री. निशांत चौधरी, श्री. दत्तात्रेय सावंत आणि अन्य धर्मप्रेमी यांनी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. समितीच्या आग्रहानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणीही समितीने केली.
१. रुग्णालयाच्या वसतीगृहातील हर्षला पाटील त्यांच्या खोलीतील देवघरातील श्री गणेश आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तींचे नियमित पूजन करत. तेथील ख्रिस्ती परिचारिकेने यावरून त्यांच्याशी वाद घातला आणि ५ जून या दिवशी वरील प्रकार केला.
२. याविषयी जाब विचारल्यावर ती उद्धटपणे म्हणाली, ‘‘मी ख्रिस्ती आहे. माझ्यासमोर मला देव नकोत. मी तुमच्या देवांना मानत नाही.’’
३. रुग्णालय व्यवस्थापनाने ६ जून या दिवशी परिचारिकेला निलंबित केले. याचा राग मनात धरून त्याच दिवशी संध्याकाळी तिने सामान घेण्याच्या बहाण्याने खोलीत प्रवेश केला आणि सूडबुद्धीने पुन्हा एकदा देवघरातील मूर्ती चप्पल काढण्याच्या ठिकाणी ठेवून पाडल्या. अशा प्रकारे तीन तिने देवतांची विटंबना केली. तेथून जातांना तिने धमकी दिली, ‘‘मी ख्रिस्ती असल्याने देवाला मानत नाही, हर्षलाला सांगा की, वसतीगृहाच्या बाहेर भेट, तेथे मी तिला दाखवते.’’
रणरागिणी शाखेच्या सौ. प्रवीणा पाटील म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि हिंदु देवतांची विटंबना करणारे हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणात पोलिसांची तत्परता स्वागतार्ह आहे; मात्र कायद्याचा धाक बसण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक होणेही आवश्यक आहे. अटक होईपर्यंत रणरागिणी शाखा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत रहातील.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा