अनेक जण गंभीररित्या भाजले

विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश )- स्टीलच्या कारखान्यातील स्टील बनणार्या विभागात वितळलेले स्टील एका मोठ्या पात्रातून (‘लॅडल’मधून) वाहून नेतांना यंत्रणेत बिघाड होऊन मोठ्या प्रमाणात वितळलेले अतीउष्ण स्टील खाली सांडल्याने ९ कर्मचार्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण गंभीररित्या भाजले. घायाळ झालेल्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. या दुर्घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सैनिक, आपत्ती निवारण पथके आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी बचावकार्य चालू केले.
कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ‘एन्.टी.सी.-३ हीट एफ्’शी संबंधित काम चालू असतांना ही दुर्घटना घडली; या वेळी वर उचलले जात असलेल्या वितळलेल्या पोलादाचा मोठा भाग अचानक गळू लागला आणि आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या.
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला घटनास्थळी वेगाने बचावकार्य करण्याचा आणि घायाळांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचा आदेश दिला.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न